मुंबई

या गीतामुळे ‘होम क्वारंटाईन’चा काळ सुखाचा 

अमित गवळे

पाली : कोरोना संकटात होम क्वारंटाईनचा काळ अनेकांसाठी अस्वस्तता निर्माण करणारा ठरतो. त्यामुळे संगीताचा आधार अशा व्यक्तींना मिळाला तर त्यांच्यासाठी हा काळ सुखाचा आणि धीर देणारा ठरू शकतो. याच भावनेतून प्रसिद्ध आगरी गायक - गीतकार तरे बंधूनी गरी- मराठी रॅप गीत तयार केले आहे. जप रे थोडे  जाणून घे... कोरोनानी दिले आता वेळ फार... चार भिंतीनी नाही माणसांनी बनते घर... असे हे गीत असून सध्या समाजमाध्यमांवर त्याची धूम आहे. 

होम क्वारंटाईनमुळे घरात काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कोणी टीव्ही, तर कुणी समाजमाध्यमांवर, तर कुणी वाचन करून वेळ घालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ठाण्यातील सर्वेश तरे आणि रिध्देश तरे या बंधूंनी घरात मिळेल त्या साधनांचा वापर करत आगरी-मराठी भाषेतील रॅप गीत बनविले आहे. त्याचे संगीत संयोजन धनराज देवाडीकर यांनी केले आहे. विषेश म्हणजे गाण्याचे चित्रीकरण घरातच करण्यात आले आहे. गणेश दिक्षीत यांनी गाण्याचे चित्रीकरण केले आहे. गीतात कोरोनासोबत सामाजिक विषय देखील हाताळले आहेत.

गीतात सर्वेश तरे म्हणतात, चंद्रावर गाड तू नंतर तुझे गाडे...पृथ्वीवरती माणुसकीचे नाते... जप रे थोडे... जाणून घे कोरोनानी दिले आता वेळ फार... चार भिंतीनी नाही  माणसांनी बनते घर... 
हे रॅप गीत युट्यूबवर पहायला मिळेल. रसिक या गाण्यास चांगला प्रतिसाद देत आहेत, असे रिद्धेश तरे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

कोरोना संकटात नागरिकांना दिलासा देण्यासाठी आगरी - मराठी रॅप तयार केले आहे. याद्वारे घरीच थांबण्यासाठी विनंतीही करण्यात आली आहे. घरी बसूनही आपण काही प्रबोधनात्मक व कलात्मक करु शकते हे सांगण्याचाही हा प्रयत्न आहे. 
- सर्वेश तरे, गायक- कलाकार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT